Last Updated: Thursday 1st September 2022 09:20:17 AM
साहित्यप्रेमी ग्रामसेवक मंच व माझी ग्रामपंचायत वेबसाईट द्वारा आयोजित राज्यस्तरीय लेख स्पर्धेचा निकाल आज (दि.३१ ऑगस्ट २०२२) जाहीर करण्यात आला. "ग्रामसेवक" या विषयावर लेख स्पर्धेचे आयोजन जून जुलै २०२२ या महिन्यात साहित्यप्रेमी ग्रामसेवक मंचच्या Whatsapp समूहावर करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण १३ लेखक सहभागी झाले. त्यापैकी ११ ग्रामसेवक लेखक तर २ बाह्य स्पर्धक होते.
साहित्यप्रेमी ग्रामसेवक मंच समूह प्रशासक श्री. विनोद उमरतकर यांनी अभ्यासपूर्ण परिक्षणानंतर आज निकाल घोषित केला.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:
?प्रथम क्रमांक?
श्रीमती सिमादेवी निंबाजी बेडसे
?द्वितीय क्रमांक?
श्रीमती भारती चंद्रकांत निकम
?तृतीय क्रमांक?
श्री.नवनाथ बारकू गोरे
?उत्तेजनार्थ?
श्री तानाजी बबन धरणे
श्री विशाल गोविंद लोंढे
श्री मनोहर युवराज महिरे
यावेळी मनोगत व्यक्त करतांना श्री. विनोद उमरतकर म्हणाले,
"खरं तर स्पर्धा फक्त निमित्त आहे,ग्रासेवकांनी लिहते व्हावे हाच मुख्य उद्देश आहे, विचारवंत फ्रान्सिस बॅकन म्हणतात की "वाचन माणसाला परिपूर्ण बनवतं तर लेखन माणसाला समृद्ध करतं...!" अर्थात समृद्ध होण्यासाठी लेखन आवश्यक आहे.
आपल्या ग्रामसेवका मध्ये कितीतरी प्रतिभावंत कवी लेखक आहे परंतु ग्रामपंचायतीच्या कामकाजाच्या ओझ्याखाली त्याची ही लेखनकला आज शेवटच्या घटका मोजताना दिसत आहे.पण काही ग्रामसेवक बंधू भगिनींना खरंच दाद द्यावी लागेल की जे आपल्या व्यस्त कामकाजातून वेळ काढून साहित्यलेखन करतात आणि त्यांचे लेखन इतर ग्रामसेवकासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
आजचे समाज माध्यम हे ग्रामसेवका बाबत उच्च कोटीची नकारात्मकता पसरविताना आपल्याला दिसत आहे त्यासाठी आता आपल्याच समोर येऊन आपले सुख दुःख ,आपल्या वेदना ,आपले अनुभव जगासमोर साहित्यलेखना मधून मांडणे अत्यावश्यक झाले आहे,आपण स्वतः व्यक्त होणे आवश्यक झाले आहे"
माझी ग्रामपंचायत वेबसाईटच्या व्यवस्थापक जयश्री बोबडे आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या:
"गावपातळीवर काम करतांना ग्रामसेवक बंधू- भगिनींना विविध आव्हाने आणि समस्यांना सामोरे जावे लागते. ही सर्व आव्हाने लीलया पेलून महाराष्ट्राचे ग्रामीण प्रशासन ग्रामसेवक बंधू भगिनी चालवत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे.
साहित्यप्रेमी ग्रामसेवक मंचचे समूह प्रशासक श्री. विनोद उमरतकर सरांनी सर्व ग्रामसेवक बंधू भगिनींना साहित्यिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार.
माझी ग्रामपंचायत www.majhigrampanchayat.com ही वेबसाईट सुद्धा प्रामुख्याने ग्रामसेवक बंधूंना त्यांच्या कामकाजात मदत व्हावी म्हणून गेली ४ ते ५ वर्षांपासून काम करत आहे. अनेक ग्रामसेवक बंधू-भगिनी या वेबसाईट व अँपचा वापर करून त्यांच्या कामकाजात सुलभता आणत आहेत.
माझी ग्रामपंचायत वेबसाईटच्या वतीने प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना बक्षीस म्हणून अनुक्रमे १ वर्षं, ६ महिने, ३ महिने वेबसाईट/ऍप चे मोफत subscription देण्यात येणार आहे.
SB Graphics Yavatmal यांच्या वतीने विजेत्या व सहभागी सर्व स्पर्धकांना आकर्षक प्रमाणपत्रे देण्यात आली.