Last Updated: Monday 28th June 2021 12:19:19 PM
नागपूर दि. 17 :- केंद्र शासनाने कोविडशी चांगल्या प्रकारे लढा देणाऱ्या ग्रामपंचायतींच्या कामाची दखल घेतली आहे. केंद्र शासनाच्या पंचायतराज विभागाच्या वतीने प्रकाशित पुस्तिकेत जिल्ह्यातील खुर्सापार ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला आहे.
‘बेस्ट प्रॅक्टीसेस टु फाईट कोविड-19 बाय पंचायत ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तिकेत राज्यातील 6 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. खुर्सापार ग्रामपंचायतीने कोविडशी लढण्यास केलेल्या चांगल्या उपाययोजनांचा उल्लेख आहे. त्यामध्ये खुर्सापार ग्रामपंचायतीने खुर्सापार गावाने मात्र कोरोना पासून गावाचे संरक्षण केले आहे.
काय आहे खुर्सापार पॅटर्न
मागील 24 मार्च 2020 पासूनच कोविड -19 विषयी शासनाने व आरोग्य विभागाने दिलेल्या वेळोवेळी सूचनाचे पालन करण्यासाठी जनजागृती व लोकसहभागातून ग्रामपंचायत खुर्सापार ने मोठ्या प्रमाणात अभियान राबविले. यामध्ये गावातील युवक व महिलांची वार्डनिहाय कोविड योद्धा म्हणून नियुक्ती केली. लोक सहभागातून शासकीय व सार्वजनिक इमारतींना सॅनिटायझर सेन्सॉर मशीन लावण्यात आल्यात. तसेच शासनाने लावलेल्या लॉकडाऊनचे तंतोतंत पालन होण्याकरिता गावातील मुख्य रस्ते, व चौकात सीसीटीव्ही कॅमरे लावण्यात आले.
गावात व बाहेरील गावातील लोकांच्या प्रवेशांवर लक्ष देऊन त्यांना वारंवार सूचना देण्यात आले. तसेच सार्वजनिक कार्यक्रम यावर सुद्धा बंधने घालण्यात आली. गावात ध्वनिप्रक्षेपण यंत्रणेद्वारे दिवसभरातून कोरोना विषयक संदेश, विविध ध्वनिफित व डॉक्टरांचे मनोगताद्वारे जनजागृती करण्यात आली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासबंधी वारंवार सूचना देण्यात आल्यात. सार्वजनिक, व वैयक्तिक स्वच्छता यावर जास्त भर देण्यात आला
.
गावामधे असलेले होमगार्ड यांना लोकवर्गणीतून थोडेफार मानधन देऊन, गावात प्रवेश करणाऱ्या लोकांना कोविडसंदर्भात सूचना व मार्गदर्शनसुद्धा देण्यात आले. दर महिन्यात गावात, क्लोरिन फवारणी व धुरळणी करण्यात आली. गावकरी, युवक मंडळे, आरोग्य, शिक्षण व इतर, कृषी, व इतर कर्मचारी या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने कोरोनाला दूर ठेवण्यास मदत झाली. खुर्सापार ग्रामपंचायतीच्या कामगिरीबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.
(source: महासंवाद)