Last Updated: Sunday 11th July 2021 10:27:04 AM
(बीड दि.10) आष्टी तालुक्यातील ग्रामपंचायत सुंबेवाडी येथे दिनांक 10 जुलै रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान हेच जीवदान,रक्तदान हेच सर्व श्रेष्ठ दान असे समजले जाते. राज्यातील विविध रुग्णालयामध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढीमधील रक्तसाठा कमी पडू लागला आहे. ही बाब लक्षात घेऊन आपल्या गावाची थोडीशी मदत म्हणून सुंबेवाडी ग्रामपंचायत व सी एस आर डी यांच्या अतर्गंत शनिवारी दि १० जूलै रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबीराचे नियोजन सामाजिक कार्यकर्ते सुखदेव लोंखडे, सुंबेवाडीचे सरपंच योगेश शेळके,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केले.या प्रसंगी सरपंच श्री. योगेश शेळके म्हणाले की, रक्तदान ही एक काळाची गरज आहे अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे तरुणांनी रक्तदान केले पाहीजे.सामान्य जनतेस मदतीचा हात मिळावा या अनुषंगाने या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. अशा प्रकारे महाराष्ट्रातील प्रत्येक ग्राममपंचायत अतर्गंत गावात रक्तदान शिबीर आयोजित केले तर कोरोना काळात रक्ताचा जो तुटवडा जाणवत आहे तो भरून निघेल. सुंबेवाडी ग्रामपंचायत मेजर अमर वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली खुप चांगल्या प्रकारे काम करत आहे कोरोना काळात वेगवेगळ्या उपाय योजना राबवून सुंबेवाडी गाव कोरोना पासून दूर ठेवले आहे.सुंबेवाडी या गावाची हळू हळू एक आदर्श गाव होण्यास वाटचाल चालू आहे.याचाच एक भाग म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष डाँ शेख, श्री बाबासाहेब भिटे, मेजर आरूण साहेब, श्री युवराज खटके, प्रा.दादा सर, ज्ञानेश्वर सोनवणे सर,आजिनाथ जगधने सर,सुंखदेव लोंखडे सर,सुर्यकांत निकनवरे सर,चंद्रगूप्त खलाशी साहेब, सुंबेवाडी ग्रामस्थ,यूवा तरूण वर्ग आदी उपस्थित होते.