Last Updated: Thursday 5th October 2023 05:25:56 AM
(जालना ) चितळी पुतळी येथे दि. १ आक्टोबर रोजी ग्रामपंचायत चितळी पुतळी मार्फत एक दिवस माझ्या गावाच्या स्वच्छतेसाठी स्वच्छ गाव , सुंदर गाव , माझ गाव अभियान राबविण्यात आले. महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या पत्रानुसार जालना जिल्हा परिषद व जालना पंचायत समितीच्या आदेशानुसार निवड केलेल्या ग्रामपंचायत चितळी पुतळी मध्ये श्रमदानातून स्वच्छतेची चळवळ राबविण्यात आली.ही मोहीम आदर्श असून ती फक्त गाव व तालुक्यापुरती राहता महाराष्ट्राला दिशा देणारी ठरू शकते, जेव्हा ध्येयाने प्रेरित होऊन लोक एकत्र येतात त्यावेळी क्रांती घडत असते व असेच स्वच्छतेबाबतची क्रांती ग्रामपंचायत चितळी पुतळी मध्ये घडतांना दिसून आली. असे उद्गार उपमुख्य कार्यकारी अधिकारी जमधडे सर यांनी कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी बोलत असताना आपले विचार व्यक्त केले.माहीती तंत्रज्ञ तायड सर यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले.
एक दिवसीय स्वच्छता अभियानात सुरू असलेल्या श्रमदानातून स्वच्छतेच्या कामात गावातील महिला, पुरुष ,शालेय विद्यार्थी,स्वच्छते जनक गाडगेबाबा,महात्मा गांधी यांच्या वेशभुषेतील विद्यार्थी ,गावातील भजनी मंडळीनी तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील स्वच्छतेचा संदेश देणारे अभंग म्हणत स्वच्छता दिंडीच्या फेरीने गावातून महिला पुरुषानी हातात झाडू घेऊन स्वच्छता केली. प्रत्येकाच्या मनात एक जोश व नवचेतना निर्माण करुन गावातून स्वच्छता दिंडीच्या माध्यमातून गाव परीसर स्वच्छ करत सिध्देश्वर महादेव मंदिर येथे समारोप करण्यात आला. समारोप प्रसंगी स्वच्छतादूत सन्मान सोहळा माध्यमातून गावातील गाडगेबाबा म्हणुन ओळखले जाणारे नेहमीच आपल्या परिसरासह गाव स्वच्छ ठेवणारे " भास्करराव बुरकुल ,रंगनाथअप्पा कोरे ,सखाराम उमप " यांचा ग्रामपंचायत चितळी पुतळी व जिल्हा परिषद जालना वतीने स्वच्छतादूत म्हणून सत्कार शाल,सन्मान पत्र देऊन करण्यात आला. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्री.जमधडे सर,जिल्हा माहीती तंत्रज्ञ श्री.तायड सर विस्तारअधिकारी श्री.सुर्यवंशी सर ,स्वच्छ भारत मिशनचे श्री.कुलकर्णी सर,श्रीमती.खरात मँडम, सरपंच राजेंद्र वांजुळे सह ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, बचतगट प्रतिनिधी सह उपस्थित होते.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलताना सरपंच राजेंद्र वांजुळे यांनी गावाविषयी स्वच्छ गाव , सुंदर गाव , माझ गाव करणे साठी विविध योजनेच्या माध्यमातून सार्वजनिक शौचालय,भुमिगत नाली बांधकाम जलसमृध्द गावच्या माध्यमातून गावातुन वाहणाऱ्या विद्रुपा नदीच्या पात्रात सिंमेट नाली बंधारे, स्वच्छ पाणीपुरवठासाठी आरो प्लांट शाळा व अंगणवाडी अशा योजना कमी कालावधीत ग्रा.पं.नी राबविल्या तर जल जीवन मिशनच्या माध्यमातून लवकरच "हर घर नल हर घर जल"पाणीपुरवठा योजना घनकचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापनासाठी सार्वजनिक कचरा कुंडी,घंटागाडी तर हरित गाव म्हणुन वृक्ष लागवड सह सुंदर गाव उपक्रमात मुख्य सिंमेंट रस्ते,मंदिर व बाजार परिसरात पेव्हरब्लाँक अशा विविध योजना राबविण्यासाठी आपली ग्रामपंचायत तत्परतेने प्रयत्नशील असुन आपल्या सर्वांचे प्रयत्न साथ खूपच मोलाचे ठरणार आहे.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिवाजी जाधव सर यांनी केले.