महा आवास अभियान २०२०-२१ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

Last Updated: Wednesday 27th April 2022 10:42:37 AM


प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण मध्ये गोंदिया तर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये अहमदनगर जिल्हा अव्वल

मुंबई, दि. 27 : महा आवास अभियान 2020-21 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणमध्ये गोंदिया जिल्हा प्रथम ठरला असून धुळे दुसऱ्या आणि ठाणे जिल्हा तृतीय क्रमांकांवर सर्वोत्कृष्ट ठरला आहे. त्याचबरोबर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये अहमदनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर, रत्नागिरी जिल्हा द्वितीय आणि वर्धा जिल्हा तृतीय क्रमांकावर सर्वोत्कृष्ट जिल्हा ठरला आहे. गोंदिया जिल्ह्याने सर्वात जास्त उपक्रमामध्ये पुरस्कार पटकावण्याचा मान संपादन केला आहे. राज्यात राबविण्यात आलेल्या महा आवास अभियान 2020-21 चे राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांची नावे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केली आहेत.

राज्यात राबविण्यात येत असलेल्या विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमध्ये गतिमानता व गुणवत्ता वाढीसाठी महा आवास अभियान– 2020-21 राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या अभियानात 5 लाख पेक्षा जास्त घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत.

या अभियानामधे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थाना, 10 अभियान उपक्रमांमध्ये अभियान कालावधीत केलेल्या कामाच्या टक्केवारीच्या आधारे एकत्रित गुणांकन करुन पुढीलप्रमाणे महा आवास अभियान पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याची माहिती मंत्री श्री.मुश्रीफ यांनी दिली.

1) सर्वोत्कृष्ट विभाग :  प्रधानमंत्री आवास योजनाग्रामीण :-  कोकण – प्रथम, नागपूर – द्वितीय, नाशिक – तृतीय.  राज्य पुरस्कृत आवास योजना :-  कोकण – प्रथम, नाशिक – द्वितीय, पुणे – तृतीय.

2) सर्वोत्कृष्ट जिल्हे :  प्रधानमंत्री आवास योजनाग्रामीण :-  गोंदिया – प्रथम, धुळे – द्वितीय, ठाणे – तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- अहमदनगर – प्रथम, रत्नागिरी – द्वितीय,  वर्धा – तृतीय.

3) सर्वोत्कृष्ट तालुके :  प्रधानमंत्री आवास योजनाग्रामीण :- गोरेगाव (जि.गोंदिया) – प्रथम, गगनबावडा (जि.कोल्हापूर) – द्वितीय, अकोले (जि.अहमदनगर)– तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- सडक अर्जुनी (जि.गोंदिया) – प्रथम, मुक्ताईनगर  (जि.जळगाव)- व्दितीय,  कागल (जि.कोल्हापूर) – तृतीय.

4) सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायती :  प्रधानमंत्री आवास योजनाग्रामीण :- नाव (जि.सातारा) – प्रथम, वाडोस (जि.सिंधुदुर्ग) – द्वितीय, तडेगाव (जि.गोंदिया) – तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- अंबावडे (जि.पुणे) – प्रथम, अणाव (जि.सिंधुदुर्ग) – द्वितीय,  बोरगाव (जि.चंद्रपूर)– तृतीय.

5) सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारती :  प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण :- करंजेपुल (जि.पुणे) – प्रथम, देर्डे कोऱ्हाळे (जि.अहमदनगर) – द्वितीय,  निंभी खुर्द (जि.अकोला) – तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- चिंचवली (जि.ठाणे)– प्रथम, शिरवली (जि.पुणे)- द्वितीय,  अंदूरा (जि.अकोला) – तृतीय.

6) सर्वोत्कृष्ट गृहसंकुले :  प्रधानमंत्री आवास योजनाग्रामीण :- लोणी (जि.अहमदनगर)– प्रथम, येडोळा (जि.उस्मानाबाद) – द्वितीय, कणकापूर (जि.नाशिक)– तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- खारेकर्दुणे (जि.अहमदनगर)– प्रथम, अदासी (जि.गोंदिया)- द्वितीय,  मुणगे (जि.सिंधुदुर्ग) – तृतीय.

या व्यतिरीक्त, ‘महा आवास अभियान- 2020-21’ मधील विशिष्ट 10 उपक्रमांत संख्यात्मक प्रगतीनुसार उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्ह्यांना खालीलप्रमाणे ‘महा आवास अभियान विशेष पुरस्कार’पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

1) सर्वात जास्त भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणारे जिल्हे प्रधानमंत्री आवास योजनाग्रामीण :- जळगाव – प्रथम, अमरावती – द्वितीय, अहमदनगर – तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- गोंदिया – प्रथम, बुलढाणा – द्वितीय,  नाशिक – तृतीय.

2) सर्वात जास्त घरकुलांच्या उद्दिष्टांप्रमाणे मंजूरी देणारे जिल्हे प्रधानमंत्री आवास योजनाग्रामीण :- गोंदिया – प्रथम, भंडारा – द्वितीय, अमरावती – तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- उस्मानाबाद – प्रथम, नांदेड – द्वितीय,  बीड – तृतीय.

3) सर्वात जास्त मंजूर घरकुले पूर्ण करणारे जिल्हे  :  प्रधानमंत्री आवास योजनाग्रामीण :- गोंदिया – प्रथम, नंदूरबार – द्वितीय, भंडारा – तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- अहमदनगर – प्रथम, चंद्रपूर – व्दितीय,  गोंदिया – तृतीय.

4) सर्वात जास्त बहुमजली इमारती उभारणारे जिल्हे : कोल्हापूर – प्रथम, सातारा – द्वितीय, बुलढाणा – तृतीय.

5) सर्वात जास्त गृहसंकुले उभारणारे जिल्हे : वर्धा – प्रथम, सातारा – द्वितीय, गोंदिया – तृतीय.

6) सर्वात जास्त घरकुल मार्ट सुरु करणारे जिल्हे : अमरावती – प्रथम, गोंदिया – द्वितीय, भंडारा – तृतीय.

7) सर्वात जास्त लाभार्थ्यांना वित्तीय संस्थांचे गृहकर्ज मिळवून देणारे जिल्हे : भंडारा – प्रथम, नांदेड – द्वितीय, सोलापूर – तृतीय.

8) सर्वात जास्त आदर्श घरांची निर्मिती करणारे जिल्हे : औरंगाबाद – प्रथम, सातारा – द्वितीय, नांदेड – तृतीय.

9) सर्वात जास्त कॉर्पोरेटस्वयंसेवी आणि सहकारी संस्थांचे सहकार्य घेणारे जिल्हे : पालघर – प्रथम, अहमदनगर – द्वितीय, सोलापूर – तृतीय.

10) इतर विशेष उपक्रम : नाशिक – प्रथम, नागपूर – द्वितीय, सांगली – तृतीय.

हे पुरस्कार वितरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रमुख उपस्थित करण्याचे नियोजित असून पुरस्कार वितरण समारंभाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

(source: महासंवाद) 

बातम्या

अधिनियम (कायदे)

सरपंच व सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास १ वर्षाची मुदतवाढ – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

पंचायत विकास अधिकारी पद निर्मितीसाठी तज्ज्ञ समितीचे गठन – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

महाआवास अभियानाला ५ जूनपर्यंत मुदतवाढ – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

महा आवास अभियान २०२०-२१ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकरिता केंद्राचा दुसरा हप्ता प्राप्त – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर-उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारात 17 ग्रामपंचायतींचा समावेश

बचतगटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेच्या अनुदान रकमेत वाढ

जीवनविद्या मिशनच्या सहभागाने आता होईल ग्रामसमृद्धी – ग्रामविकास तसेच कामगार मंत्री हसन मुश्रीफ

६ हजार ग्रामपंचायतींमध्ये उभारणार स्वयंचलित हवामान केंद्रे – कृषिमंत्री दादाजी भुसे

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा अनारक्षित करून १८ जानेवारीला मतदान

कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटतम नातेवाईकास सानुग्रह सहाय्य अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ विकसित

ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात वाढ

राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढविण्यासंदर्भात मान्यता

ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

ग्रामपंचायतींमधील ७ हजार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबरला मतदान

मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना राबविण्याचा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना मदत देण्यासाठी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितींची स्थापना – अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांची माहिती

कोरोनाशी ज्या जिद्दीने, ईर्षेने आपण लढलो त्याच ईर्षेने स्वच्छतेसाठी लढा – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जातवैधता प्रमाणपत्र वेळीच प्राप्त करून घ्यावे – राज्य निवडणूक आयुक्त

ऊसतोड कामगार बांधवांची नोंद पारदर्शक पद्धतीने व्हावी – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

मागासवर्गीय जागांचे एकत्रित आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही यासाठी ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करण्याचा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ ऑक्टोबरला मतदान

प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना मिळणार भरीव निधी – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

घराघरांत नळाद्वारे पाणी पोहचविण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखून युद्ध पातळीवर मोहीम राबवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ

तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत संतश्रेष्ठ रामराव महाराज सभागृह बांधता येणार – बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार

ग्राम कृषी संजीवनी समित्या तातडीने गठित करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-२ राज्यात राबविणार

चांपा ग्रामपंचायतीतर्फे डास प्रतिबंधात्मक निर्मूलन मोहीम

पथदिव्यांसह पाणीपुरवठा योजनांच्या थकित वीज बिलांची वसुली, वीज तोडणी थांबविण्यासह तोडलेल्या जोडण्या पूर्ववत करा

रक्तदान यज्ञ करून वाहिली पत्नीला श्रध्दांजली; माजी ग्रामपंचायत सदस्याचा समाजापुढे वेगळा आदर्श

सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ च्या अनुषंगाने गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

ग्रामपंचायत सुंबेवाडी येथे रक्तदान शिबीर संपन्न

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

नागपूर जिल्ह्यातील चांपा गावाने करून दाखवलं; गावातील ९०% टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण

सरपंच दांपत्याचा अनोखा उपक्रम, लेकीच्या वाढदिवसाला केले वृक्षारोपन आणि रक्तदान !

केंद्र शासनाकडून नागपूर जिल्ह्यातील खुर्सापार ग्रामपंचायतीचे कौतुक

ग्रामपंचायतींना पथदिवे, पाणीपुरवठा योजनांची देयके पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानातून अदा करण्यास मान्यता

गाव कोरोनामुक्त ठेवणारच सरपंचानी दिला मुख्यमंत्र्यांना विश्वास

कोरोनामुक्त गाव स्पर्धा घोषीत

कुंभेफळ गाव कोरोनामुक्तच राहणार- सरपंच कांताबाई मुळे यांनी व्यक्त केला विश्वास

ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी यांच्या कायम प्रवास भत्त्यात 400 रुपयांची वाढ

केंद्र शासनामार्फत दिले जाणारे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर

राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३,२०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या भुखंडावरील बांधकामांना आता नगररचनाकाराच्या परवानगीची गरज नाही