जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ ऑक्टोबरला मतदान

Last Updated: Monday 13th September 2021 08:03:53 AM


मुंबई, दि. 13 (रानिआ): धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे; तसेच पालघर जिल्हा परिषदेच्या व त्याअंतर्गतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील त्याच दिवशी मतदान होईल आणि सर्व ठिकाणी 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

श्री. मदान यांनी सांगितले की, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान होणार होते; परंतु सर्वोच्च न्यायालयाचे 6 जुलै 2021 रोजीचे आदेश आणि राज्य शासनाने कोविड-19 मुळे पोटनिवडणुका स्थगित करण्याबाबत केलेली विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका 9 जुलै 2021 रोजी आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या होत्या. या प्रकरणी 9 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या सुनावणीत मात्र सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाचे 11 ऑगस्ट 2021 रोजीचे कोविड-19 संदर्भातील निर्बंध पोटनिवडणुकांसाठी लागू होत नसल्याचा निर्णय दिला आहे; तसेच पोटनिवडणुकांचा कार्यक्रम पुढे चालू ठेवण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने तात्काळ निर्णय घेण्याबाबतही आदेश दिले आहेत. हे आदेश आणि कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेवून राज्य निवडणूक आयोगाने आता पोटनिवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूरसह पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून कोरोना रुग्णांची संख्या व आठवडाभरातील दैनंदिन व मृतांच्या संख्येबाबत अहवाल मागविला होता. त्यावरून या सहा जिल्ह्यांतील कोरोना परिस्थिती आटोक्यात असल्याचे दिसून आले. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूरच्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 22 जून 2021 रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमात पालघर जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा समावेश करण्यात आलेला नव्हता. कारण त्यावेळी कोविड-19 संदर्भातील राज्य शासनाच्या निकषानुसार पालघर जिल्ह्याचा समावेश स्तर-3 मध्ये होता. त्यामुळे तेथील पोटनिवडणुका जाहीर केलेल्या नव्हत्या. आता मात्र या सर्व निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
 

पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. 21 सप्टेंबर 2021 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. पुढील टप्पे धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूरच्या जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसोबत होतील. कारण या पाच जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम छाननीनंतर स्थगित करण्यात आला होता. आता पालघरसह सर्व ठिकाणी 21 सप्टेंबर 2021 रोजी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. नामनिर्देशनपत्रासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरूद्ध जिल्हा न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी 27 सप्टेंबर 2021 रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी 29 सप्टेंबर 2021 पर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान; तर 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदेच्या एकूण 85 निवडणूक विभाग आणि पंचायत समितीच्या एकूण 144 निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होईल. त्यासाठी कोरोना संदर्भातील आवश्यक ते सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजून दक्षता घेण्यात यावी, असे निर्देशही देण्यात आले असल्याचे श्री. मदान यांनी सांगितले.

(source: महासंवाद) 
 

बातम्या

अधिनियम (कायदे)

९ ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान; अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना: राज्यातील महिलांना मिळणार वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत

अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार रिक्त पदे लवकरच भरणार – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुधारित किमान वेतनातील फरकाच्या रकमेसाठी अर्थसंकल्पात तरतूद – मंत्री गिरीष महाजन

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, कागदपत्रांच्या अटीतही बदल

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम पुस्तक (चौधरी लॉ पब्लिशर्स) 2024 latest आवृत्ती आता घरपोहच मिळेल

लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर - महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदान; देशात आजपासून आदर्श आचार संहिता लागू

पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता

अहमदनगर शहर व जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता

शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक

ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गांचा मोदी आवास घरकुल योजनेत समावेश; शासन निर्णय जारी – इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेच्या अनुदानात वाढ

मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल योजनेसाठी दिव्यांग व्यक्तींना अर्ज करण्याचे आवाहन

प्रत्येक ग्रामपंचायतीच्या भिंतीवर, माझी ग्रामपंचायत कॅलेंडर- माझी ग्रामपंचायत कॅलेंडर 2024 - बुकिंग सुरू

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी संवेदनशीलतेने प्रयत्न करा – ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

ग्रामपंचायत निवडणुकांतील उमेदवारांनी तीस दिवसांत ट्रू-व्होटर ॲपद्वारे निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक

ग्रामपंचायत इमारत बांधकामांसाठीच्या निधीत वाढ

राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’ मुलींना करणार लखपती

 "स्वच्छ गाव,सुंदर गाव,माझ गाव" या आभियानातुन चितळी पुतळी जि.जालना येथे स्वच्छता दिंडी व श्नमदानातुन स्वच्छतेची चळवळ

२ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबरला मतदान

“एक तारीख एक तास” स्वच्छता उपक्रमात महाराष्ट्राला अव्वल आणूया, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

‘सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम’ स्पर्धेत पाटगाव (जि.कोल्हापूर) ला राष्ट्रीय स्तरावर कांस्य श्रेणीतील प्रमाणपत्र

गावाच्या स्वच्छतेसाठी नागरिकांचा सहभाग उत्साहवर्धक – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील

पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी ‘विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना’; शासन निर्णय जारी

कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ

प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रातील 2 महिलांना मिळणार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी ८ वाजता

ग्रामसेवक तानाजी धरणे यांची "हेलपाटा" कादंबरी लवकरच वाचकांच्या भेटीला,मान्यवरांकडून कौतुक

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी २ डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र ऑफलाईन सादर करण्याची मुभा – राज्य निवडणूक आयुक्त

डिजिटल इंडियाला वेग देण्यासाठी ग्रामीण भागातील मनोऱ्यांकरिता मोफत जागा

प्रधानमंत्री आवास योजनेतील निवासी सदनिकांसाठी मुद्रांक शुल्क घटविले

स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करणार

थेट सरपंचपदांसह ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान

७ हजार ६४९ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

गावांमध्ये स्वच्छतेच्या सातत्यासाठी सरपंचांनी जनजागृती करावी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

ग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या प्रशासकांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय

थेट सरपंचपदांसह ११६६ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला मतदान

साहित्यप्रेमी ग्रामसेवक मंच व माझी ग्रामपंचायत वेबसाईट द्वारा आयोजित राज्यस्तरीय लेख स्पर्धेचा निकाल जाहीर

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मिळणार पुरस्कार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

६०८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ सप्टेंबरला मतदान-थेट सरपंचपदाचाही समावेश

स्वराज्य सप्ताह अंतर्गत १७ ऑगस्ट रोजी समूह राष्ट्रगीत गायन उपक्रम

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित

जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५०

सरपंच पदाची थेट निवडणूक; ग्रामविकास विभागाचा अध्यादेश जारी

‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ : ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमाबाबत मार्गदर्शक सूचना जारी

ग्रामीण गृहनिर्माण योजनांतील भूमिहीन लाभार्थींना जागा देण्याबाबत निर्णय

सरपंचाची निवड थेट जनतेमधून होणार

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी १८ जुलैला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

राज्यात ९ ते १७ ऑगस्ट दरम्यान “स्वराज्य महोत्सव”

‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’च्या माध्यमातून आता मतदार यादीत नाव शोधण्याची सुविधा

२७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ४ ऑगस्टला मतदान

एकाच दिवशी तब्बल २९ ग्रामपंचायतीनी केला विधवा प्रथेविरुद्ध ठराव

वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

राज्यात ६ जून हा दिवस ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा होणार

१५ ऑगस्ट पासून एक रुपयामध्ये १० सॅनिटरी नॅपकीन – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

सरपंच व सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास १ वर्षाची मुदतवाढ – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

पंचायत विकास अधिकारी पद निर्मितीसाठी तज्ज्ञ समितीचे गठन – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

महाआवास अभियानाला ५ जूनपर्यंत मुदतवाढ – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

महा आवास अभियान २०२०-२१ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकरिता केंद्राचा दुसरा हप्ता प्राप्त – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर-उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारात 17 ग्रामपंचायतींचा समावेश

बचतगटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेच्या अनुदान रकमेत वाढ

जीवनविद्या मिशनच्या सहभागाने आता होईल ग्रामसमृद्धी – ग्रामविकास तसेच कामगार मंत्री हसन मुश्रीफ

६ हजार ग्रामपंचायतींमध्ये उभारणार स्वयंचलित हवामान केंद्रे – कृषिमंत्री दादाजी भुसे

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा अनारक्षित करून १८ जानेवारीला मतदान

कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटतम नातेवाईकास सानुग्रह सहाय्य अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ विकसित

ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात वाढ

राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढविण्यासंदर्भात मान्यता

ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

ग्रामपंचायतींमधील ७ हजार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबरला मतदान

मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना राबविण्याचा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना मदत देण्यासाठी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितींची स्थापना – अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांची माहिती

कोरोनाशी ज्या जिद्दीने, ईर्षेने आपण लढलो त्याच ईर्षेने स्वच्छतेसाठी लढा – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जातवैधता प्रमाणपत्र वेळीच प्राप्त करून घ्यावे – राज्य निवडणूक आयुक्त

ऊसतोड कामगार बांधवांची नोंद पारदर्शक पद्धतीने व्हावी – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

मागासवर्गीय जागांचे एकत्रित आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही यासाठी ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करण्याचा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ ऑक्टोबरला मतदान

प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना मिळणार भरीव निधी – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

घराघरांत नळाद्वारे पाणी पोहचविण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखून युद्ध पातळीवर मोहीम राबवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ

तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत संतश्रेष्ठ रामराव महाराज सभागृह बांधता येणार – बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार

ग्राम कृषी संजीवनी समित्या तातडीने गठित करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-२ राज्यात राबविणार

चांपा ग्रामपंचायतीतर्फे डास प्रतिबंधात्मक निर्मूलन मोहीम

पथदिव्यांसह पाणीपुरवठा योजनांच्या थकित वीज बिलांची वसुली, वीज तोडणी थांबविण्यासह तोडलेल्या जोडण्या पूर्ववत करा

रक्तदान यज्ञ करून वाहिली पत्नीला श्रध्दांजली; माजी ग्रामपंचायत सदस्याचा समाजापुढे वेगळा आदर्श

सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ च्या अनुषंगाने गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

ग्रामपंचायत सुंबेवाडी येथे रक्तदान शिबीर संपन्न

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

नागपूर जिल्ह्यातील चांपा गावाने करून दाखवलं; गावातील ९०% टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण

सरपंच दांपत्याचा अनोखा उपक्रम, लेकीच्या वाढदिवसाला केले वृक्षारोपन आणि रक्तदान !

केंद्र शासनाकडून नागपूर जिल्ह्यातील खुर्सापार ग्रामपंचायतीचे कौतुक

ग्रामपंचायतींना पथदिवे, पाणीपुरवठा योजनांची देयके पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानातून अदा करण्यास मान्यता

गाव कोरोनामुक्त ठेवणारच सरपंचानी दिला मुख्यमंत्र्यांना विश्वास

कोरोनामुक्त गाव स्पर्धा घोषीत

कुंभेफळ गाव कोरोनामुक्तच राहणार- सरपंच कांताबाई मुळे यांनी व्यक्त केला विश्वास

ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी यांच्या कायम प्रवास भत्त्यात 400 रुपयांची वाढ

केंद्र शासनामार्फत दिले जाणारे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर

राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३,२०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या भुखंडावरील बांधकामांना आता नगररचनाकाराच्या परवानगीची गरज नाही