Last Updated: Saturday 7th January 2023 06:31:24 AM
ग्रामसेवक तानाजी धरणे यांची "हेलपाटा" कादंबरी लवकरच वाचकांच्या भेटीला येत असून त्यांच्या कादंबरीचे विविध मान्यवर लेखंकाकडून कौतून होत आहे.
कवी / गीतकार तानाजी धरणे यांचे यापुर्वी " शेताच्या बांधावर " "सांजवेळ "व " स्वप्नचिञ हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले असुन त्यांचा चौथा काव्यसंग्रह " चांदणं पेरीत जाऊ " हा अध्ययन बुक या पब्लिकेशनद्वारे प्रकाशनाच्या वाटेवर आहे . तसेच त्यांची हेलपाटा ही कादंबरी पी आर ग्रुप वरुड अमरावती या प्रकाशनामार्फत प्रकाशित होत आहे . प्रकाशनापूर्वीच या साहित्यकृतिला अनेक मान्यवर लेखकांच्या खुप सुंदर प्रतिक्रिया आल्या आहेत.
त्यांच्या या कादंबरीविषयी काही प्रतिनिधीत्मक प्रतिक्रिया:
"मित्रवर्य तानाजी धरणे
प्रकाशनाच्या वाटेवर असणाऱ्या आपल्या 'हेलपटा' या कादंबरी साठी मनपूर्वक शुभेच्छा.
ग्रामिण धाटणीची ही कादंबरी वाचकांच्या मनावर निश्चितच अधिराज्य करील आणि लेखक म्हणून आपणास अत्युच्च शिखरावर नेईल.
आपल्या जीवनातील अपरिमित संघर्षाच्या प्रत्यक्षानुभूतींचा हा पट शब्दरुप करताना आपण केलेली भावनाप्रधान मौलिक शब्दसुमनांची उधळण कादंबरीचं सौंदर्य खुलवण्यास कारणीभूत ठरत आहे.
भरजरी शब्द, लाघवी ग्रामिण भाषा, आत्मिय नाती आणि नात्यांतील कंगोरे, घटनाक्रम व त्यांची गुंफण सारंच विलोभनीय आहे.
काव्य लेखन, काव्य वाचन, गीत गायन यात आपला हातखंडा आहेच मात्र या आत्मचरित्राच्या रुपाने आपण एक उत्कृष्ट लेखक साहित्यिक म्हणून उदयाला येत आहात हे आपल्या जीवनमार्गातील दिव्य संचित आहे.
एक बहुआयामी कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी असल्याचा प्रत्यय आपल्या कार्यकर्तृत्वातून येतो.
नोकरी मिळेपर्यंतचा आपला, आपल्या कुटुंबाचा पराकोटीचा संघर्षमय कालखंड ही या लेखनामागील प्रेरणा असल्याचे पानापानातून जाणवते. प्रत्यक्षानुभूतींमुळेच लेखनाला साहित्यिक धार तथा मूल्य प्राप्त झाले आहे.
भविष्यकालिन फलद्रूप साहित्यिक वाटचालीसाठी आमच्या अभीज् श्री पब्लिकेशन्सद्वारा हार्दिक शुभेच्छा.
ही कादंबरी पी आर ग्रुप पब्लिकेशन अमरावती वरुड यांजकडुन प्रकाशित होत आहे ह्या कादंबरीस खुप सार्या शुभेच्छा ..!!!!!
-प्रा. विजय जोरी (सेनि प्राचार्य लोणावळा)
लेखक... मर्मबंधातली ठेव आक्का, तस्मैश्री... तांबे बाई.
"तानाजी धरणे हे आमच्या गावात जन्माला आलेलं आणि तावून सुलखून निघालेलं बावनकशी सोनं आहे. आत्तापर्यंतचा त्यांचा साहित्य क्षेत्रातील प्रवास सृजनशील कवी/गीतकार म्हणून पाहिला आहे. त्यांचे काही कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत तर काही प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
त्यांच्या कवितांनी रसिक वाचकांच्या मनात एक आगळं वेगळं गारुड निर्माण केलं आहे.
परंतु आज त्यांची हेलपटा ही अस्सल ग्रामीण मराठी कादंबरी (आत्मकथन) वाचल्यानंतर माझ्यासहित प्रत्येक वाचकांचे मन भूतकाळात रमाल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप सारे भलेभुरे अनुभव येत असतात.हे स्वानुभव व्यक्त करण्याचे अनेक प्रकार आहेत.त्यामध्ये लेखक तानाजी धरणे यांनी लेखनीचा वापर केला. स्वतः लेखक आणि त्यांच्या परिवाराने पोटाचं खळग भरण्यासाठी उपासलेले कष्ट वाचून नकळत डोळ्याची कड आपोआपच ओली होते आणि लेखक प्र. ई. सोनकांबळे सरांच्या आठवणीचे पक्षी या आत्मकथनाची आठवण येते.
एकेकाळी ओसाड माळरान असलेल्या आनोसेवाडीच्या भूमिमध्ये जन्माला आलेलं हे रत्न साहित्य निर्मिती मध्ये हरवून गेलं आहे.साहित्य निर्मितीची आवड असल्यामुळे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असतानाही आपल्या कर्तव्याचे जाणीव ठेवून साहित्य निर्मितीसाठी एक छंद म्हणून वेळ देत आहे. त्यांच्या साहित्या निर्मितीला कोकणातील महाडच्या भूमीचा सोनपरीस लाभल्यामुळे त्यांची लेखनशैली बहरात गेली व त्यातूनच हेलपटा ही अस्सल ग्रामीण बाज असणारी कादंबरी निर्माण झाली. लेखक तानाजी धरणे यांच्या या कादंबरीचे वाचन करत असताना ज्या रसिक वाचकांनाही बालपणी परिस्थितीचे चटके सोसले त्यांना त्या चांगल्या वाईट प्रसंगाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही असे मला तरी वाटते. असो.
आमचे ग्रामवासी मित्र तानाजी धरणे यांच्या साहित्य क्षेत्रातील गरुडभरारीला आनोसेवाडी,आंबळे ग्रामवासियांच्या वतीने तसेच पुणे जिल्ह्यात शिक्षणाची ज्ञानगंगा खेडोपाडी पोहोचवणारे कै. बाबुराव रामचंद्र घोलप साहेब यांनी स्थापन केलेल्या श्री भैरवनाथ माध्य. व उच्च माध्य. विद्यालय करडे या विद्यालयातील सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.
" तानाजी धरणे यांची ही कादंबरी अमरावतीचे पी आर ग्रुप पब्लिकेशन हे नामांकित प्रकाशन प्रकाशित करत आहे त्याचे प्रमुख शंतनु रसे हे आघाडीचे कवी व लेखक आहेत. त्यांची स्वत:ची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत ...
--श्री विष्णू संकपाळ सर
सेवानिवृत्त अध्यापक.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे.
दिनांक:- ३१ डिसेंबर, २०२२.