सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ च्या अनुषंगाने गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

Last Updated: Monday 12th July 2021 11:08:05 AM


मुंबई दि. 29 : कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव (२०२१) साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने गृहविभागाने  मार्गदर्शक सूचना जारी  केल्या आहेत.

‘ब्रेक दि चेन’च्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या निर्बंध पातळीबाबत (Level of Restrictions for Break the Chain) वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त कोणतीही शिथिलता देता येणार नाही असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका, स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.

कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी.

श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती गणपतीकरिता २ फुटांच्या मर्यादेत असावी. यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची/ पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे.उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पाहावे. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.

सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम / शिबिरे उदा. रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता         यांबाबत जनजागृती करण्यात यावी. आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. श्रीगणेशाच्या  दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. गणपती मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनीटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरीष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील/इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नयेत. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने गणेशमूर्तींच्या विसर्जनाकरिता कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी.

कोविड- १९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील असेही गृहविभागाने स्पष्ट केले आहे.

(source: महासंवाद)

बातम्या

अधिनियम (कायदे)

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी २ डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र ऑफलाईन सादर करण्याची मुभा – राज्य निवडणूक आयुक्त

डिजिटल इंडियाला वेग देण्यासाठी ग्रामीण भागातील मनोऱ्यांकरिता मोफत जागा

प्रधानमंत्री आवास योजनेतील निवासी सदनिकांसाठी मुद्रांक शुल्क घटविले

स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करणार

थेट सरपंचपदांसह ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान

७ हजार ६४९ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

गावांमध्ये स्वच्छतेच्या सातत्यासाठी सरपंचांनी जनजागृती करावी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

ग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या प्रशासकांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय

थेट सरपंचपदांसह ११६६ ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला मतदान

साहित्यप्रेमी ग्रामसेवक मंच व माझी ग्रामपंचायत वेबसाईट द्वारा आयोजित राज्यस्तरीय लेख स्पर्धेचा निकाल जाहीर

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मिळणार पुरस्कार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

६०८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ सप्टेंबरला मतदान-थेट सरपंचपदाचाही समावेश

स्वराज्य सप्ताह अंतर्गत १७ ऑगस्ट रोजी समूह राष्ट्रगीत गायन उपक्रम

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित

जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५०

सरपंच पदाची थेट निवडणूक; ग्रामविकास विभागाचा अध्यादेश जारी

‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ : ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमाबाबत मार्गदर्शक सूचना जारी

ग्रामीण गृहनिर्माण योजनांतील भूमिहीन लाभार्थींना जागा देण्याबाबत निर्णय

सरपंचाची निवड थेट जनतेमधून होणार

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी १८ जुलैला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

राज्यात ९ ते १७ ऑगस्ट दरम्यान “स्वराज्य महोत्सव”

‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’च्या माध्यमातून आता मतदार यादीत नाव शोधण्याची सुविधा

२७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ४ ऑगस्टला मतदान

एकाच दिवशी तब्बल २९ ग्रामपंचायतीनी केला विधवा प्रथेविरुद्ध ठराव

वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

राज्यात ६ जून हा दिवस ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा होणार

१५ ऑगस्ट पासून एक रुपयामध्ये १० सॅनिटरी नॅपकीन – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

सरपंच व सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास १ वर्षाची मुदतवाढ – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

पंचायत विकास अधिकारी पद निर्मितीसाठी तज्ज्ञ समितीचे गठन – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

महाआवास अभियानाला ५ जूनपर्यंत मुदतवाढ – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

महा आवास अभियान २०२०-२१ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकरिता केंद्राचा दुसरा हप्ता प्राप्त – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर-उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारात 17 ग्रामपंचायतींचा समावेश

बचतगटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेच्या अनुदान रकमेत वाढ

जीवनविद्या मिशनच्या सहभागाने आता होईल ग्रामसमृद्धी – ग्रामविकास तसेच कामगार मंत्री हसन मुश्रीफ

६ हजार ग्रामपंचायतींमध्ये उभारणार स्वयंचलित हवामान केंद्रे – कृषिमंत्री दादाजी भुसे

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा अनारक्षित करून १८ जानेवारीला मतदान

कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटतम नातेवाईकास सानुग्रह सहाय्य अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ विकसित

ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात वाढ

राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढविण्यासंदर्भात मान्यता

ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या निवडणुका लढविणाऱ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

ग्रामपंचायतींमधील ७ हजार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबरला मतदान

मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना राबविण्याचा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना मदत देण्यासाठी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितींची स्थापना – अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांची माहिती

कोरोनाशी ज्या जिद्दीने, ईर्षेने आपण लढलो त्याच ईर्षेने स्वच्छतेसाठी लढा – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जातवैधता प्रमाणपत्र वेळीच प्राप्त करून घ्यावे – राज्य निवडणूक आयुक्त

ऊसतोड कामगार बांधवांची नोंद पारदर्शक पद्धतीने व्हावी – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

मागासवर्गीय जागांचे एकत्रित आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही यासाठी ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करण्याचा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ ऑक्टोबरला मतदान

प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना मिळणार भरीव निधी – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

घराघरांत नळाद्वारे पाणी पोहचविण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखून युद्ध पातळीवर मोहीम राबवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ

तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत संतश्रेष्ठ रामराव महाराज सभागृह बांधता येणार – बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार

ग्राम कृषी संजीवनी समित्या तातडीने गठित करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-२ राज्यात राबविणार

चांपा ग्रामपंचायतीतर्फे डास प्रतिबंधात्मक निर्मूलन मोहीम

पथदिव्यांसह पाणीपुरवठा योजनांच्या थकित वीज बिलांची वसुली, वीज तोडणी थांबविण्यासह तोडलेल्या जोडण्या पूर्ववत करा

रक्तदान यज्ञ करून वाहिली पत्नीला श्रध्दांजली; माजी ग्रामपंचायत सदस्याचा समाजापुढे वेगळा आदर्श

सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ च्या अनुषंगाने गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

ग्रामपंचायत सुंबेवाडी येथे रक्तदान शिबीर संपन्न

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

नागपूर जिल्ह्यातील चांपा गावाने करून दाखवलं; गावातील ९०% टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण

सरपंच दांपत्याचा अनोखा उपक्रम, लेकीच्या वाढदिवसाला केले वृक्षारोपन आणि रक्तदान !

केंद्र शासनाकडून नागपूर जिल्ह्यातील खुर्सापार ग्रामपंचायतीचे कौतुक

ग्रामपंचायतींना पथदिवे, पाणीपुरवठा योजनांची देयके पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानातून अदा करण्यास मान्यता

गाव कोरोनामुक्त ठेवणारच सरपंचानी दिला मुख्यमंत्र्यांना विश्वास

कोरोनामुक्त गाव स्पर्धा घोषीत

कुंभेफळ गाव कोरोनामुक्तच राहणार- सरपंच कांताबाई मुळे यांनी व्यक्त केला विश्वास

ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी यांच्या कायम प्रवास भत्त्यात 400 रुपयांची वाढ

केंद्र शासनामार्फत दिले जाणारे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर

राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३,२०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या भुखंडावरील बांधकामांना आता नगररचनाकाराच्या परवानगीची गरज नाही