Last Updated: Thursday 22nd July 2021 08:25:20 AM
नागपूर: (दिनांक २२ जुलै) चांपा येथे डासांचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणून सरपंच अतिश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज ग्रामपंचायतीतर्फे गावांतील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत गावात डास प्रतिबंधात्मक निर्मूलन मोहीम राबविण्यात आली ग्रामपंचायतीने गवत साचलेल्या पाण्यात जंतू नाशक फवारणी केली, सोबतच ग्रामपंचायतीकडून वेळोवेळी औषध व धूर फवारणी करण्यात येत असल्याचे सरपंच अतिश पवार यांनी सांगितले.
गावात डास प्रतिबंधात्मक निर्मूलन मोहीम यशस्वी राबवावी, यासाठी सरपंच अतिश पवार यांनी स्वतः पुढाकार घेतला व चांपा आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेविका मालाबाई काकडे यांनी नागरिकांच्या घरोघरी जाऊन गावात डासाचे प्रमाण वाढू नये म्हणून गावातील नागरिकांना मलेरिया, डेंग्यू, तसेच साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी डेंगू, मलेरिया,प्रतिबंधात्मक जंतू नाशक औषधी साचलेल्या पाण्यात व टाक्यात टाकून नागरिकांना डेंगू, मलेरिया रोगापासून आपला व कुटुंबंयाचा रक्षण करण्यासाठी घरातील साचलेले उदा. टाकी, टायर, कुलर,ड्रम आदी ठिकाणी पावसाळ्यात गावातील साचलेले पाण्याचे डबके तसेच गटारीच्या सांडपाण्यात आदी ठिकाणी पावसाचे पाणी साचलेले अश्या ठिकाणी जंतू नाशक औषधी टाकण्यात आली.
घरातील साफसफाई करून एक दिवस कोरडा दिवस पडण्याचा सल्ला ग्रामस्थांना दिला आहे.
चांपा ग्रामपंचायतीने वृक्ष लागवडी सोबतच गावात स्वच्छता मोहीम राबविण्यापाठोपाठ धूर व औषध फवारणी करून डास प्रतिबंधात्मक निर्मूलन मोहीम राबविण्यात येत आहे .
●●●
(तुमच्या ग्रामपंचायतीची यशोगाथा पोहचवा जगभर
तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जर तुम्ही काही प्रेरणादायी काम, प्रकल्प, अभिनव योजना राबविल्या असतील आणि त्याची माहिती महाराष्ट्र आणि आणि महाराष्ट्राबाहेर पोहोचवायची आपली इच्छा असल्यास फोटोसह लिहून पाठवा तुमच्या यशोगाथा व बातम्या
majhigrampanchayat@gmail.com वर )