Last Updated: Wednesday 7th July 2021 07:02:36 AM
चांपा ,३ जुलै : राज्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर करण्यावर राज्य सरकारचा भर आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील चांपा येथील नागरिकांचे ९० टक्के लसीकरण करण्यात आले आहे. ९० टक्के लसीकरण पुर्ण झालेले हे उमरेड तालुक्यातील पहिले गाव ठरले आहे. ही माहिती उमरेड तालुक्याचे तहसीलदार प्रमोद कदम यांनी दिली आहे.
चांपा गट गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या दुर्गम भागातील सुकळी,समशेरनगर या पारधी समाजाच्या वस्तीत सरपंच अतिश पवार यांच्या पुढाकारातून ९८% टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले . सर्व वयोगटातील व्यक्तींना पहिला डोस अर्थात कोरोनाची लस देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या गावात एकही कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. कोरोनामुक्त असलेले हे गाव आता गावातील सर्व लाभार्थींना पहिला डोस मिळालेले गाव ठरले आहे.
सुकळी, समशेरनगर हे गाव पूर्णतः दुर्गम असून येथे आदिवासी समाजातील गोंड व पारधी समाज बहुतांशी प्रमाणात आहे. यामध्ये ग्रामपंचायत व जिल्हा व तालुका आरोग्य विभागाकडून ही मोहीम राबविण्यात आली. टोचाल तर वाचाल विशेष अभियान राबवून सर्वाना पहिला डोस देऊन लसीकरण पूर्ण करण्यात आले.
कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबीरचे आयोजन
चांपा ग्रामपंचायतीच्या सभागृहात शनिवारी ता ३ जुलै रोजी करण्यात आले होते.यावेळी लोकनियुक्त सरपंच अतिश पवार, पालक अधिकारी डॉ. प्रमोद सपाटे,चांपा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक बी बी वैद्य यांनी कोविड लसीकरणाबाबत जनजागृती करून १८ वयोगटावरील २०१, २२६ लोकांचे पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात आले.
पाचगाव आरोग्य केंद्रात जाऊन ५०च्या वर नागरिकांनी लस टोचून घेतली त्यानंतर गावात ६५वयोगटावरील नागरिकांचे पहिल्या टप्प्यात कोविड लसीकरण शिबीरात १२७, तर ४४ ते ३० वयोगटावरील दुसऱ्या टप्यातील लसीकरण शिबीरात १२९, तर तिसऱ्या टप्प्यात १८ वयोगटावरील २२६, आणि आज ता.३ शनिवारी २०१ नागरिकांनी कोरोना लसीकरणाचा लसीचा पहिला डोस टोचून घेत चांपा येथील १०५८ लोकसंख्या पैकी गंभीर आजार,गरोदर माता,बाळाची आई,स्थलांतरित, व मृत्यू झालेले नागरिक, असे एकंदरीत दीडशेच्यावर नागरिकांना वगळुन १८वयोगटावरील तीनही टप्प्यातील सर्व वयोगटातील एकूण १०५८लोकसंख्यापैकी ७६४ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेऊन चांपा ग्रामपंचायतीचे ९०% टक्के लसीकरण पूर्ण करून घेतले आहेत.उर्वरित नागरिकांचे लसीकरण डॉक्टर यांच्या सल्ल्यानुसार लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती चांपा गावाचे पालक अधिकारी डॉ. प्रमोद सपाटे यांनी दिली.
तुमच्या ग्रामपंचायतीच्या सकारात्मक बातम्या फोटोसह पाठवा : majhigrampanchayat@gmail.com वर (निवडक बातम्या प्रसिध्द केल्या जातील)