Last Updated: Wednesday 30th June 2021 06:24:16 AM
जालना जिल्ह्यातील चितळी पुतळी ग्राम पंचायतीच्या सरपंच व सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र जिल्हा समन्वयक श्रीमती स्वप्ना वांजुळे आणि त्यांचे पती गोदावरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र वांजुळे नेहमीच लोकोपयोगी आणि समाजिक कार्यात अग्रेसर असतात.
२६ जून रोजी त्यांची कन्या कु. स्वरा हिचा वाढदिवस होता. आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त या दांपत्यांनी आपले सामाजिक उत्तरदायीत्व म्हणून रक्तदान केले आणि नैसर्गिक उत्तरदायीत्व म्हणून वृक्षारोपण केले. आपल्या लेकीचा वाढदिवस अभिनव पद्धतीने साजरा करीत समाजापुढे त्यांनी आदर्श ठेवला आहे. प्रत्येक पालकांनी या अशा वेगळ्या पद्धतीने कार्य केल्यास समाजासाठी त्याचा नक्कीच फायदा हाईल.
वाढदिवसानिमित्त अनाठायी होणारा खर्च टाळून प्रत्येकांनी समाजोपयोगी कार्य करावे असे आवाहन सरपंच श्रीमती स्वप्ना वांजुळे आणि त्यांचे पती गोदावरी प्रतिष्ठानचे श्री. राजेंद्र वांजुळे यांनी केले आहे.