नमस्कार ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी मित्रांनो,

     आपणांस सांगण्यास अतिशय आनंद होतो की, हे संकेतस्थळ (website) खास आपल्यासाठी तयार करण्यात आलेले आहे. आपण गावपातळीवर काम करणारे एक महत्वाचे कर्मचारी आहात. गावपातळीवर काम करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, त्यात आणखी एकापेक्षा अधिक 2- 3 ग्रामपंचायत चा पदभार असल्यास मग तर विचारायलाच नको, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ग्रामस्थ ,वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी मंडळी यांचा समन्वय साधत कार्यालयीन कामकाज करणे,सर्व अभिलेखे अद्ययावत ठेवणे,सभा – प्रोसिडिंग  लिहणे अन वेळोवेळी विविध नमुन्यात अहवाल (reports) भरुन देणे.... हुश्श... ही सर्व तारेवरची कसरत.... रात्री झोपतेवेळी 11 वाजता पंचायत समितीच्या  whatsapp ऑफीस ग्रुप वर कसला तरी मॅसेज येऊन धडकणार... कसला तरी महत्वाचा अहवाल अर्जंट सादर करावयाचा असल्याने आपली दुसर्या दिवशी पुन्हा धावाधाव सुरु... 

“Duty करायची म्हटलं की हे सर्व आलंच..!” असं आपण मनाशी म्हणून पुन्हा कामाला लागणार...आणि ते खरंच आहे मित्रांनो, मला कुठेतरी एक वाक्य वाचल्याचं आठवतं –

 “ Enjoy the work you do, & do the best you can”  

म्हणजे ‘तुमचं काम तुम्ही enjoy केलं पाहिजे, आणि ते तुम्ही जेवढं अधिक छान करु शकत असाल तेव्हढं छान केलं पाहिजे’


तुमचं काम तुम्ही Enjoy करता का...? 


आपण आपलं काम कधी enjoy करु शकतो, जेव्हा ते अधिक सुलभ सोप्या रितीने आपण करु शकतो, ही वेबसाईट त्यासाठी आपणांस मदत करणार आहे. आपल्याला दैनंदिन कामकाजाचे व अहवाल (reports) चे सर्व नमुने आपल्याला इथे उपलब्ध असतील, वेळोवेळी नवीन अद्यायावत केले जातील . इथे आपल्याला ग्रामपंचायत संबधित संपूर्ण आवश्यक व परिपुर्ण माहिती मिळणार आहे, त्याचबरोबर आणखीही बरंच काही... आपले काम स्मार्ट होण्यासाठी सर्व काही आपणांस येथे एका क्लिकवर मिळेल... 

चला तर मित्रांनो, स्वत:SMART बनूया, आपल्या कामाला SMART बनवुया आणि आपली ग्रामपंचायत SMART  बनवुया.... 


....

जाहिरातीजाहिराती

जाहिराती